४ नेने करंडकआज नेने कॉलेजला एक महत्त्वाचा दिवस होता. दरवर्षीप्रमाणे सामाजिक उपक्रम राबवण्याचा मोठा कार्यक्रम असायचा- नेने करंडक! यासाठी कॉलेजमधले वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे ठरविक ग्रुप केले जात. नेनेच्या वेगवेगळ्या वर्गातल्या टॅलेंटेड मुलांनी नाव देऊन टाकली. आज यादी जाहीर होणार होती. प्रिया आणि अनु अगदी नऊच्या काट्यावर कॉलेजच्या एलसीडीच्या इथे येऊन पोहोचले. त्याच्या आधीच सर्व जण येऊन पोहोचले होते. सगळे एलसीडीकडे डोळे लावून बसले काऊंट डाऊन झाला ३.. २.. १.. ओह नो.. ग्रुपची नावं बघून सर्व चकित झाले. यावेळी नियम बदलला होता. सगळे डिपार्टमेंट मिक्स केले होते आणि सर्व गुण लक्षात घेऊन ग्रुप पाडले होते. चार जणांचे दोन गट पडले होते. कवितासुद्धा