मृगजळ - भाग 1

  • 12.6k
  • 4.8k

    आठ वाजून गेले होते. कामवाल्या मावशींनी अचानक सुट्टी घेतल्याने मनीषाची घाई उडाली होती. त्यात सकाळी सकाळी चुलत बहिणीचा - समीराचा - फोन आला आणि ' असशील तशी ये.. ' ह्या रडक्या आवाजातील विनंतीनंतर मनीषाला राहवलं नाही. चुलत असली तरी बहीणच होती. भांड्याची जबाबदारी आपल्या मुलीवर टाकत, थोड्याश्या सूचना देऊन ती बेडरूममध्ये पळाली. कपाटातून लागेल ती ओढणी गळ्यात टाकत तिने पर्स उचलली आणि पळतच बाहेर निघाली.   सकाळची वेळ त्यामुळे निदान ऑटो वेळेवर मिळाली. पण ऑटोवाल्याचं साशंक नजरेने पाहणं तिला जास्तच खटकलं. त्याला नाही म्हटलं तर दुसरी रिक्षा मिळेपर्यंत वांधेच होते... कॅबची वाट पाहण्यात लेट होईल म्हणून तिने तो