फ्लॅट नंबर ३०६

  • 5.2k
  • 1.9k

  भाग -१ "लव्ह यू जिंदगी लव्ह यू जिंदगी "हे गाणे गाडीमध्ये वाजत होते आणि त्याबरोबर अवनी आणि अमितच्या गप्पा हि रंगात आल्या होत्या मध्येच अमित ने गाण्याचा आवाज कमी केला आणि अवनीला पहात म्हटले "फायनली आपण पोहचलो ती समोर दिसते ती आपली नवीन सोसायटी " समोरून इमारत निळ्या रंगानी खुलून दिसत होती तिला पाहत अवनी म्हणाली "वाह मस्त आहे " अमित ने गाडी सोसायटी च्या आत घेतली पाटोपाट सामानाने भरलेला टेम्पो हि आत आला अमित ची ह्या शहरात बदली झाली होती अमित आणि अवनी ह्या नवीन सोसाटीत राहायला आले होते दोघे हि गाडीतुन उतरले अवनी तर आजूबाजूची हिरवळ आणि