ऋतू बदलत जाती... - भाग..16

  • 6.2k
  • 3.2k

ऋतू बदलत जाती....१६ "अच्छा.. ठीक आहे " तो बाहेर गेला पण दरवाजाच्या बाहेरच थांबला .दहा एक मिनिटे तो तिथेच घुटमळला. मग त्याने त्याचा मोबाईल उघडला. " हाय राधा.. झोपलीस का? मला झोप नाही येत.. गप्पा मारायच्या का ..??"अनिकेतने मेसेज टाईप केला आणि तो सावीच्या दरवाज्याजवळ उभा राहून पाठवला . बरोबर त्याच वेळी सावीच्या रूममध्ये एक मेसेज टोन वाजली. त्याचं काळीज क्षणभर थांबलं..... आता पुढे..... अनिकेतने त्याचा मोबाईल आधीच सायलेंट करून ठेवलेला होता. "अनिकेतने आज मला राधा म्हणून हाक मारली..?? नाही कदाचित भास असेल माझा.... नेहमी माझं त्यांच्यासोबत राधा नावानेच संभाषण होतं ना म्हणून...... कदाचित काय ..भासच असेल... तेवढ्यात तिच्या मोबाईलची