प्रेमा तुझा रंग कसा ? - 2

  • 6.5k
  • 2.6k

दुसऱ्या दिवशी प्रथमला ऑफिसला जायचं जीवावर आलेलं, अविकचा मूड कसा असेल काय माहित...? एकतर तो फारसा रागावत नाही आणि रागावला कि मग बस्स..... कसबस मनाची तयारी करत थोडं लेटच पोचला तो ऑफिसला...प्रथमला असं शांत येताना बघून वॉचमन पण अचंबित झाला. "प्रथमभाऊ, आज गप्प गप्प...?" वॉचमनचा प्रश्न. सिक्युरिटी गेटपासून ते बॉसपर्यंत सगळ्यांचाच आवडता होता तो. असं उतरलेल्या चेहऱ्याचा प्रथम प्रथमच पाहत होते सगळे. "काही नाही."  त्याने पडक्या चेहऱ्याने उत्तर दिल आणि मान हलवत एंट्रन्सच्या दिशेने निघाला. कडू चेहरा आणि खांदे पाडूनच तो आपल्या डेस्कवर पोचला. त्याला काहीच प्रसन्न वाटत नव्हतं. अविकच्या सीटवर पाहिलं तर अजून आला नव्हता तो. फोन टिवटिवला बघितलं