प्रपोज डे...फसलेला

  • 5k
  • 1
  • 1.6k

प्रपोज डे... फसलेला... "हॅल्लो, अग ऐकतेयस ना? " " हं, ऐकतेय बोल ना... " " उद्या भेटायचं का आपण ड्युटी संपल्यावर? " " उद्या माझी फोर्टीन आहे त्यामुळे नाही जमायचं, काय घाई आहे भेटायची? भेटू की सावकाश... ' " हो घाईच झालीय मला, एवढ्या सुंदर आवाज लाभलेल्या मुलीला केव्हा एकदा भेटेल असं झालंय मला! खरंच सांग ना कधी भेटशील? किती दिवस असं बोर्डावरून एकमेकांशी बोलत राहायचं? ठरव ना की कधी भेटूयात..." ती विचारात पडली.दोन महिन्यापुर्वी नाईटला असताना बोर्डवर कॉल इंडिकेटर लागला.शहराच्या दुसऱ्या टोकाच्या एक्स्चेंज कडून आलेला तो कॉल होता.रात्री सहसा असे कॉल येत नसायचे.काहीतरी अर्जंट असेल असा विचार करून तिने