मारिया

  • 3.3k
  • 1
  • 1.2k

       हि कथा आहे मारिया नावाच्या ‘भाटगाव' येथे राहणाऱ्या एका कॅथॉलिक स्त्रीची, वय वर्ष ४९ असून ती एक विधवा आहे, २ मुले पदरात टाकून तिचा नवरा गेला. आज त्याला जाऊन तब्बल १० वर्ष झालेत, नावाला का म्हणा पण थोडी फार इस्टेट आहे तिच्या नवऱ्याची, त्यातूनच मिलणाऱ्या उत्पनावर तिचा आणि तिच्या मुलांचा उदरनिर्वाह चालत होता परंतु आज दोन्ही मुले तिच्यापासून विभक्त राहतात. तिचा मोठा मुलगा रॉकी आहे,  ह्याने महाविद्यालयीन शिक्षण अर्ध्या वर सोडून एका खाजगी कंपनी मध्ये नोकरी करतो आहे. रॉकी ची सॅन्ड्रा नावाची एक मैत्रीण आहे व तो तिच्याशीच लग्न करणार आहे. आणि दुसरा मुलगा आहे रॉनी,  हा पनवेल इथे त्याच्या मामाकडे म्हणजेच मायकल अंकल कडे राहतो