ऋतू बदलत जाती... - भाग..24

  • 4.6k
  • 2.2k

ऋतू बदलत जाती...२४.आजींनाही वाटत होतं की अनिकेत आणि शांभवी ला जरा वेळ देऊ या... म्हणून त्याही त्यांच्या रुममध्ये निघुन गेल्या. रूम मध्ये शांभवी ,अनिकेत आणि झोपलेली सावीच होती.आता पुढे.... दोघांनाही काय बोलावं ते कळत नव्हतं, सांगायचं तर भरपूर होतं.. दोघं फक्त एकमेकांकडे बघून स्मित देत होते. दहा-पंधरा मिनिटे फक्त एकमेकांकडे मनभरून बघितल्यावर अखेर शांभवीनेच चुप्पी तोडली . "खूप त्रास झाला असेल ना...?? मी नसताना.. माझ्या सावीला...."शांभवी. " फक्त तुझ्या सावीला नाही... मलाही... !..जगावं अस वाटतच नव्हतं ...........फक्त सावीसाठी जिवंत होतो....शांभवी ..!! आता तू मला सोडून कुठेच जाणार नाही ना..??"अनिकेत " अनि ...हे बघा ..! मला हातात वस्तू पकडता येतात.. मी