समुद्र आम्ही अलिबाग, मुरुड जंजिरा असे फिरायला चाललो होतो. उन्हाळ्याचे दिवस होते. ऊन तापलं असले तरी जवळच असलेला समुद्रकिनारा आपल्या खाऱ्या वाऱ्यानी स्वतःची जाणिव करून देत होता. ढगांच्याविना ते उन्हाळ्यातले मोकळे आभाळ स्वच्छ निळाईत बुडून गेलेलं. मधुनच उडणारे दोनचार पक्षी, त्यावर नक्षी चितारून जात होते. पहाता पहाता गाडीने वळण घेतलं आणि