बोधकथा - 1

  • 10.1k
  • 1
  • 5.6k

बोधकथा:- भाऊबंदकी, भावावरला राग ( कोर्ट- कचेरी :-रागावर नियंत्रण करण्याचे एक सुंदर उदाहरण -- ) एका वकीला ने सांगीतलेला हृदयस्पर्शी किस्सा - नेहमीप्रमाणे बसलो होतो. एक पक्षकार आले. हातात कागदाची पिशवी. रापलेला चेहरा. वाढलेली दाढी. मळलेली कपडे. म्हणाले.., सगळ्याच जमीनीवर, इस्टटीवर स्टे लावायचा आहे. आणखी काय कागदं पाहीजेत? किती खर्च येईल? मी त्यांना बसायला सांगितलं. ते खुर्चीवर बसले. त्यांची सर्व कागदपत्रे तपासली. त्यांच्या कडून माहीती घेतली. अर्धा पाउण तास गेला. मी त्यांना सांगितलं. , मी अजून कागदपत्रे पाहतो. तुमच्या केसचा विचार करू या. तुंम्ही असं करा ४ दिवसांनी परत या. ४ दिवसांनी ते पक्षकार पुन्हा आले. तसाच अवतार. भावा बद्दलचा राग अजूनही कमी झाला नव्हता. मी