स्वप्नस्पर्शी - 6

  • 4.6k
  • 2.3k

                                                                                              स्वप्नस्पर्शी : ६     रात्री अकरापर्यन्त घरी पोहोचले तेव्हा सगळे अगदी थकून गेले होते. रस्त्यातच जेवण करुन घेतल्यामुळे घरी आल्यावर कसेबसे कपडे बदलून सर्वजण गाढ झोपुन गेले. दुसऱ्या दिवशी घराला जरा उशिराच जाग आली. पहाटे उठणाऱ्या राघवांना आज सुर्यकिरणांनी जाग आणली. गडबडीत सगळेच उठले. आज मधुरला कामावर जायचं होतं. त्याच्या मुलांनाही शाळा होत्या