निरपेक्ष प्रेम

  • 8.1k
  • 2.7k

आज जवळजवळ एक महिना होऊन गेला..!'प्रतिक्षा' अजून कोमातून बाहेर आली नव्हती, ती एकटीच कोमात गेली नव्हती तर तिच्याबरोबर सगळं घरदार कोमात गेल्यासारखे होते..! सासू,सासरे,नवरा, दोन मुलं..! तीचं किचन,देवघर,आंगण, तीनं सजवलेला घराचा कोपरा न कोपरा...जणू तिच्यावर हिरमुसलेलं होतं. घरातील सगळं वातावरण निर्जिव झालं होत...! अठरा वर्षाची तिची मुलगी प्रणेता तिच्या आजीच्या गळ्यात पडून रडत होती.. म्हणत होती--आईला कंटाळा आला काय ग आमचा ? म्हणून इतकी विश्रांती घेते..? का नाही उठत आई ? असं म्हणून हमसून हमसून रडत होती. घराची जणू स्मशान भूमी झाली होती. कारण ही तसंच होतं..! तिच्याशिवाय कोणाचं पान हालत नव्हतं, सर्वांची मनापासून घेत असलेली काळजी, थकलेल्या सासू-सासऱ्यांची सेवा,