बोधकथा - 2 - दंड न करणे

  • 17.2k
  • 1
  • 7.1k

*सुंदर बोधकथा* २. मच्छिंद्रनाथ माळी छ. संभा- जी नगर. " दंड न करणे " _________________ एके दिवशी (संध्याकाळच्या सुमारास) सरयू नदीच्या तटावर. तीन्ही भावांसह फिरत असता, श्री रामाला बंधू भरतानं म्हटलं, "एक गोष्ट विचारु दादा.? माता कैकईनं तुला वनवास मिळावा यासाठी मंथरेसोबत जे कारस्थान रचलं, ते कारस्थान म्हणजे राजद्रोहच नव्हता का.? तिच्या या कारस्थानाने एकीकडे राज्याचा भावी राजा आणि त्याच्या पत्नीला १४ वर्षांचा वनवास भोगावा लागला. आणि दुसरीकडे महाराजा दशरथ यांचा पुत्रविरहाच्या केवळ कल्पनेनंच अपमृत्यू झाला. अशा कारस्थानासाठी (सामान्य नियमांनुसार) तर मृत्युदण्डच दिला जात असतो, तर मग तू , जी तुझीही आई आहे अशा कैकईला दंड का नाही दिलास.?" यावर