स्वप्नस्पर्शी : ७ बुधवारी आबा आले. अमेरिकन दुतावासात शुक्रवारी साडेदहाची वेळ मिळाली. दोन दिवस नुसती धावपळ चालली होती. शुक्रवारी मधुर त्यांना एंबसीमधे सोडून ऑफिसला निघून गेला. आतली प्रोसिजर आटोपली की तिघं टॅक्सीने घरी येणार होते. हळुहळू करत सगळे सोपस्कार पार पडले. नीलनी टिकिट बुक करून ठेवलेच होते. आता महिना मोकळाच होता पण आनंदात आणि तयारीच्या