विधवा

  • 7.6k
  • 2.7k

माझी आत्या बहीण सुनीताच्या लग्नासाठी मी गेलो होतो.. तिचे वडील माझे मामा हयात नव्हते.. पण माझ्या आत्याने लेकीच्या लग्नात काही कमी ठेवली नव्हती...! कसं होईल, कसं होईल असं नुसतंच म्हणणाऱ्या नातेवाईकांच्या बोलण्याकडे आणि टोमण्यांकडे कानाडोळा करत आत्यानी मुलीचं लग्न अगदी थाटामाटात लावून दिलं. बरं...! त्यावरही “एवढे पैसे कुठून आले?” असा नातेवाईंकाचा रोख होताच..! आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतची स्वप्न आईवडिलांनी त्यांच्या जन्माअगोदरच रंगवलेली असतात. अगदी तसं करणं सगळ्यांनाच शक्य होतं असं नाही. पण आपल्या परीने आई-वडील मुलांच्या कोणत्याच कार्यक्रमात काहीही कमी पडू द्यायचं नाही, याची पुरेपूर काळजी घेतात. नवरा नसल्यामुळे अर्थातच लेकीच्या लग्नाच्या खर्चाचा सगळा भार आत्यावरच वरच होता. पण,