मन फकिरे..

  • 5.5k
  • 1
  • 2k

घरी एकच लग्नघाई सुरू होती. भिंतीवर लायटिंग माळा सोडल्या होत्या. जिन्यावरून झेंडूच्या फुलांच्या माळा सोडल्या गेल्या होत्या. दारावर सुंदर, सुरेख अशी रांगोळी काढली होती. जागोजागी फुलदाणीमध्ये मस्त सुवासिक फुले होती. देवघरात आरतीचे ताट आधीच तयार करून ठेवले होते. दारावर नवरा नवरीची चारचाकी येऊन उभी राहिली. घरी एकच गोंधळ उडाला. नवरा नवरी आले... नवरा नवरी आले... म्हणून एकच गदालोळ उठला. माही आपली शालू सांभाळत चारचाकी मधून उतरली. तिच्या हृदयाचे ठोके वाढले होते. सकाळपासून लग्नविधी मध्ये वेळ कशी निघून गेली समजलेच नव्हते. पण खरी परीक्षा आता सुरू होती सासरमध्ये. तिच्या मनावर प्रचंड दडपण आले होते. निश आणि माही दारात येऊन उभी राहिले.