राजकीय सिनेमा : किती खरा किती खोटा

  • 8.7k
  • 2.9k

राजकीय सिनेमा : किती खरा किती खोटा   हे  आणि पुढील वर्ष आपल्या भारत वासियांकरीता निवडणुकांचे वर्ष आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही जिथे नांदते अशा देशातील सार्वत्रिक निवडणुकांकडे साऱ्या दुनियेचे लक्ष असते. लोकशाहीच्या या रंगमंचावरील अभूतपूर्व नाट्याचे , तिथल्या शह काटशहाचे , तिथल्या जीवघेण्या असुरी स्पर्धेचे आणि एकूणच संपूर्ण राजकारणाचे प्रतिबिंब आमच्या माध्यमाच्या दुनियेत कायमच पडत आले आहे. सिनेमा आणि राजकारण याचा आपण जेंव्हा मोठ्या परिप्रेक्षात विचार करू लागतो तेव्हा सिनेमाच्या माध्यमातून राजकीय घटनांचा व परीणामांचा घेतलेला वेध,राजकीय व सामाजिक विचारांनी परस्परांची झालेली वैचारिक घुसळण आणि गुंतागुंत याच प्रतिबिंब पाहावयास मिळू शकते.  बऱ्याचदा प्रचारकीच्या अंतस्थ हेतूने किंवा द्वेष मूलक वृत्तीने