आगाऊपणा

  • 4.4k
  • 1.5k

आगाऊपणा… फारसा त्रास होत नसल्याने डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करुन मी बरीच वर्षे माझे हर्नियाचे ऑपरेशन करणे टाळले होते.आज उद्या करत निदान दहा वर्षे अशीच गेली होती. आता रिटायर झालो असल्याने अशी चालढकल केलेली बरीच कामे करायला घेतली आहेत त्यात हे कामही करुन टाकू असे मनाशी ठरवले आणि एका प्रसिध्द सर्जनचा सल्ला घेतला. माझी तपासणी करुन त्यांनी पुढे काय काय करायचे याबद्दल मार्गदर्शन केले. त्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे ऑपरेशन करण्यापूर्वीच्या आवश्यक त्या टेस्ट्स मी करुन घेत होतो आणि त्याबरोबरच हॉस्पिटलायझेशनसाठी आवश्यक असलेली मानसिक तयारीही माझी मी करुन घेत होतो कारण आयुष्यात प्रथमच माझे एखादे ऑपरेशन करायचे होते! माझ्या सर्जनने सांगितलेल्या