भेटली तू पुन्हा... - भाग 8

  • 11k
  • 6.5k

आदि साहिल सोबत बोलून कॉल ठेवतो, व फ्रेश होण्यासाठी जातो.अन्वी आदिला भेटून आल्यापासून शांत शांतच होती. आजीला हे जाणवत ही होतं, पण ती फक्त तिच्या हालचाली टिपत होती. आल्या आल्या तिने मोबाईल चार्ज करण्यासाठी लावला. आजोबा दुकानाकडे जाण्यासाठी तयार होतं होते. अन्वी तिथून जाताच आजी आजोबांशी बोलू लागली."अहो! ऐकल का" आजीने हळू आवाजातच आजोबांना आवाज दिला."गेली पन्नास वर्षे तुमचंच तर ऐकत आलो आहे सरकार बोला" आजोबा आजींच्या गालाला हात लावत खट्याळपणे बोलले."काही ही काय तुमचं, आपलं सोडा नातीकडे पाहिलं का तुम्ही" आजी बारीक आवाजातच बोलली."का?, काय झाले तिला?" आजोबा डोळे बारीक करून बोलले."आल्या पासुन शांत शांतच आहे, त्या सीए साहेबांना