चंपा - भाग 1

(15)
  • 20.7k
  • 4
  • 15k

अर्पणपत्रिकात्या सर्व स्त्रियांमधीलप्रत्येक चंपाला... प्रस्तावना:प्रत्येक छोट्या मोठ्या गावात, शहरात एक कोपरा असतो जिथे पुरुषाची शारीरिक भूक भागवण्यासाठी वेगवेगळ्या वयाच्या स्त्रिया नटून थटून थांबलेल्या असतात. कोणी स्वतःच्या मर्जीने आलेल्या, काही घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने, काही मनाविरुद्ध, काही फसवणुकीचा शिकार झालेल्या, कोणा एखादीला विकलेले. कुठे त्याला गंगा जमाना म्हणतात तर, कुठे कामाठी पुरा किंवा बुधवार पेठ की आणखी काही, त्यातून मर्जीविरुद्ध आलेल्या मुली बाहेर पडण्याची धडपड करत नसतील का? कदाचित कोणाला बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळत असेल तर काही आयुष्यभर तिथेच अडकून पडत असतील. ज्या मुली सुटकेसाठी प्रयत्न करतात तेंव्हा त्या मुलींना कोणकोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागला असेल? वर्तमानपत्रात अनेक बातम्या असतात