अन्वी थोडी पळतच बाहेर आली व किचनमध्ये गेली. किचनमध्ये जाताच ती भिंतीला टेकून उभी राहिली. डोळे बंद करून, छातीवर हात ठेवून ती उभी होती. तिचा श्वास फुलला होता. ती स्वतःला कंट्रोल करू पाहत होती. वाढलेल्या श्वासांवर काबू करण्याचा ती प्रयत्न करत होती. "काय ग? काय झाले तुला?" आई तिला अस पाहून विचारू लागली. आईचा आवाज तिच्या कानांवर पडला. तशी ती गोंधळली. "अ....ह.... कुठे काय? काहीच तर नाही" ती आपले वाढलेल्या हार्टबिट्स वर नियंत्रण मिळवण्याचा निष्फळ प्रयत्न करत बोलली. "काही नाही कसे, मग तू इतकी धापत का आहेस? कुठे मॅरेथॉनला जाऊन आली का?" आई डोळे बारीक करून विचारत होती. "छे ग!