Dear नवरोबा...

  • 9.3k
  • 2.8k

Hiiii नवरोबा...काय आज अचानक पत्र....पाहून तर हसूच आल...माझी morning तर good च झाली राव...२ सेकंदात पूर्ण कॉलेज जगून आले... आणि काय रे आज काल हे असे पत्र लिहायचं का थांबवलं ??? विचारेन विचारेन म्हणता म्हणता २० वर्ष उलटून गेली...तुझ एक पत्र पुन्हा नव्याने जगायची ताकद देत...पण काय माझा नवरोबांना तर माझासाठी वेळच नाही...आणि काय रे तू चक्क मला...मला i love you बोलला...तुला माहिती आहे तू पूर्ण २० वर्षामध्ये मला फक्त आणि फक्त दोनदा i love you बोलला आहे...एकदा ते पाहिलं पत्र लिहाल तेव्हा आणि एकदा आता..आणि दोन्ही वेळेला बोलला ते पत्रातून...वाचलं तेव्हा अस वाटत ते पत्र घ्यावं आणि डोक्यात घालावं