स्वप्नस्पर्शी : १४ जसजश्या बॅगा भरणं सुरू झालं तसतश्या न्यायच्या गोष्टी लक्षात येऊ लागल्या. अगदी ताटं, वाट्या, चमचे, ग्लास, तांबे भांडे, स्वैपाकघरात लागणारे सामान, प्राथमिक किराणा, सुई दोरा, पासुन आठवून आठवून बॅग भरली. त्या घरात फर्निचर तर सगळं होतं पण बाकी जरूरी सामान तर घ्यावच लागणार होतं. उद्या सकाळी सातला निघायचे