इच्छामरण

  • 6.2k
  • 2.3k

‘इच्छामरण’-गरज की धोक्याला आमंत्रण. रस्त्याने चाललो होतो. गर्दी दिसली म्हणून डोकावले.एक वृध्द गृहस्थ रस्त्यात बेशुध्द होऊन पडले होते.काही लोक म्हणत होते की, त्या गृहस्थाने मुद्दाम रस्त्यावर स्वत:ला झोकून देवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता!लोकानी प्राथमिक उपचार केल्यावर ते शुध्दीवर आले,पण ते साधारण नव्वदीचे आजोबा "मला मरू द्या, कशाला वाचवले?" “मला मरायचे आहे.” असं सारखं सारखं बडबडत होते.खोलात जावून थोडी चौकशी केल्यावर समजले की शेजारच्या इमारतीत ते एकटेच रहात होते.त्यांची दोन्ही मुले याच शहरात दुसरीकडे रहातात; पण त्याच्याकडे लक्ष देत नाहीत.वृध्दापकाळ व मधूमेहाच्या आजाराने ते त्रस्त झाले आहेत व त्यांना आता असे परावलंबी जगणे नको आहे.आता तरी मृत्यू यावा असे त्याना