स्वप्नस्पर्शी - 15

  • 5.3k
  • 2.5k

                                                                                    स्वप्नस्पर्शी:१५  खिडकीतून जेव्हा सुर्यकिरणं आत आली तेव्हा सगळ्यांना जाग आली. सात वाजून गेले होते. इतका वेळ कधीच कुणी झोपत नसे, पण कालच्या प्रवासाचा शीण असेल असे आधी वाटले मग लक्षात आले की आजुबाजूला गाडयांचे आवाज नाही, दूधवाला पेपरवाला यांची बेल नाही, कुठूनही रेडिओ, टीव्हीचा आवाज नाही आणि मुख्य म्हणजे कामावर जायचे दडपण नाही की मुलांना शाळेची तयारी करुन