भेटली तू पुन्हा... - भाग 14

  • 8.3k
  • 5.1k

  "मी सरांशी बोलतो यावर" आदि म्हणाला.       "ओके, चल आता झोप तू, मी ही झोपतो उद्या वरीष्ठ लोक येणार आहेत बँकेत तपासणीला" साहिल बेडवर आडवा होत बोलला.     "आता हे कधी ठरलं यार...." आदि चकित होत थोडा वैतागुन बोलला.     "थोड्या वेळापूर्वी कॉल आलेला " साहिल हसत बोलला.     "काय थोडा उसंत म्हणून देतात की नाही ही माणसं यार..." आदि खूपच वैतागला होता.     कारण महिना झाला त्याला काय काय कागदपत्रे गोळा करायला लावत होते त्याचे वरिष्ठ. आपलं काम सोडून त्याला या बाकी कामावर पण लक्ष द्यावे लागत होतं त्यामुळे त्याची चिडचिड होत