सावित्रीबाई फुले यांची लेक

  • 5k
  • 2.1k

सावित्रीबाई फुले यांची लेकम्हणवून घेणारी व्यक्तीही सावित्रीबाईंप्रमाणेच अपार जिद्द असलेली, प्रतिकूल परिस्थितीवर अथक परिश्रमांनी मात करून आपले इप्सित साध्य करणारी आणि त्याचवेळी समाजाचाही विचार करणारी हवी. अशी एक लेक आपल्या बोइसरमधे आहे आणि तमाम बोइसरकरांना ही बाब निश्चितच भूषणावह आहे यात तिळमात्र शंका नाही. ही लेक मूळची विरारची. ती एका बैठ्या चाळीतल्या कुटुंबात जन्माला आली ती चवथी मुलगी म्हणून ! मुलगाच पाहिजे हा तो काळ असल्यामुळे घरचे जरी नाखूष झाले नसले तरी बाहेरच्यांना टोमणे मारायची आयतीच संधी मिळाली. पण घरच्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून इतर तिघींप्रमाणेच या चवथीलाही वाढविले. घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच असली तरी हिची कधीही आबाळ झाली नाही.