भेटली तू पुन्हा... - भाग 15

  • 8.1k
  • 5.3k

संध्याकाळी आदित्य व साहिल अन्वीच्या घरी तिला भेटायला गेले. घरात अजून ही शांतता होती. हे जाणवताच आदिला काळजी वाटू लागली की, अन्वीची तब्बेत अजून ठीक नाही का?, आई कुठे गेली?आत येताच त्याने आईला आवाज दिला."आई..!"एक-दोनदा आवाज दिल्यानंतर आईने आतून आवाज दिला."ये.. ये..आदि, मी देव घरात आहे" आईचा आतून आवाज येताच आदि देवघराकडे गेला. साहिल ही त्याच्या मागे मागे निघाला."आई, बाबा आले नाहीत का अजून?" आई हातातील जपमाळ डोळ्यांना लावून बाजूला ठेवत बोलली," येतीलच इतक्यात"आई उठून मागे फिरली आणि समोर साहिलला पाहून खुश झाली."अरे! साहिल बेटा कसा आहेस? खूप दिवसांनी आठवण झाली आईची" "आठवण तर रोजच येते पण ड्युटी फस्ट नियम