विहीणबाई

  • 7.1k
  • 2.3k

#विहीणबाई©® सौ. गीता गजानन गरुड."आक्के अगं अशी अवेळी आलीस ती? फोन तरी करायचा होतास. काहीतरी तुझ्या आवडीचं बनवून ठेवलं असतं. बरं. तू फ्रेश हो तोवर बटाट्याची भजी करते तुझ्या आवडीची." शारदाताई आकांक्षाला म्हणाल्या.आकांक्षा फ्रेश होऊन येईस्तोवर त्यांनी कुकर लावला. तिच्या आवडीचं आंबटगोड वरण केलं. चटकदार बटाटाभजी बनवली. स्वतःसाठी चार पोपटी मिरच्या त्याच पीठात लोळवल्या व तेलात टाकल्या. दोघींची जेवणं आवरली. ओटा आवरुन शारदाताई लेकीजवळ येऊन बसल्या. तिच्या डोक्यावरून हात फिरवत राहिल्या. आकांक्षाला एकदम भरुन आलं. आईच्या मांडीवर डोकं ठेवून ती रडू लागली. शारदाताई मग तसंच तिला थोपटत राहिल्या."आक्के,निज आत्ता. उठलीस की सांग मला निवांत.""आई..असं म्हणून आक्की तिच्या कुशीत शिरली आणि