सर्वस्व तुजला वाहूनी..

  • 6k
  • 1
  • 2.4k

#सर्वस्व तुजला वाहूनी.. गुहागरमध्ये दामलेंच पिढीजात कौलारु घर होतं. दहा एकर जमिनीत दोनशे हापूस आंब्यांची बाग होती. तीन एकर जमिनीत शेतीभाती शिवाय घराशेजारी अडीचशे माडापोफळीची झाडं होती. दामलेकाकाकाकूंना दोन मुलं होती. थोरला नितीन व त्याच्याहून सात वर्षांनी लहान निता. निता अंमळ उशिराच झालेली,आजीआजोबांची लाडकी,आईबाबांचा जीव व दादाची इटुकली पिटुकली ताई. निताची आजी शनिवारी रात्री घरच्या नारळाचं दूध काढून नितांच्या केसांना लावे. शिकेकाई, रिठा रात्री भिजत घालून ठेवी. सकाळी न्हाणीतल्या पाण्याने नातीला छ