उपरती

  • 6.6k
  • 2.3k

उपरतीक्षमा काकू व गोविंदकाका ठाण्यातील श्रीरंग सोसायटीत रहात होते. याच घरात सिद्धेश व सिद्धीचा जन्म झाला. दोघांत दोन वर्षांच अंतर होतं. घर नुसतं मुलांच्या किलबिलाटाने भरलेलं असायचं. भिंतींवरती रेघोट्या,चिमणपाखरं,आई,बाबा,आजी,आजोबा,बागुलबुवा, जोकर..काय मनाला येईल ते रेखाटलेलं पिल्लांनी. क्षमाताईंची सासू भजनाचे क्लासेस घ्यायची, देवळात. त्यामुळे घरातलं सगळं क्षमाकाकूच पहायच्या. सासऱ्यांच व तिचं छान जमे. दोघांनाही गोष्टीची पुस्तकं वाचण्याची फार आवड. सासरे क्षमा काकूला छान छान पुस्तकं आणून देत वाचायला. दोघं पुस्तक वाचून झालं की त्या गोष्टींतल्या पात्रांवर चर्चा करीत. क्षमा काकूंची सासू सुगरण होती. ती वेळ असला की क्षमाला पारंपारिक पदार्थ शिकवे. क्षमाला ते येत असायचे पण तरीही ती परत सासूच्या क्रुती पाही.