भेटली तू पुन्हा... - भाग 17

  • 7.8k
  • 4.2k

आदि अन्वीचा हात हातात घेऊन जुन्या आठवणीमध्ये हरवला होता.साहिलने सर्वांना तिचे फोटो जे आदिने सकाळी बिचवर घेतले होते ते सर्वांना दाखवले."काय आदि तू ही या झमेल्यात पडत आहेस, प्रेमापासून लांबच राहा" यश बोलला."होय संन्यासी बाबा,तू एक प्रेमपूजाऱ्याला पूजा करू नको अस कस सांगू शकतो" विशाल व राहुल एकदमच बोलले.आपल्या फ्रेंड्स सोबत बोलून आदिने त्या मुलीशी दुसऱ्या दिवशी बोलायचे असे ठरवले व झोपी गेला. दुसऱ्या दिवशी ही सकाळी तो लवकर उठून बिच वर गेला व तिला शोधू लागला पण त्याला ती कुठेच दिसली नाही.खूप उशिरापर्यंत वाट पाहून तो रिसोर्टला परत आला. त्याला अस उदास पाहून राहुल त्याच्या जवळ आला."काय झाले? अस