विक्याचं प्रेम

  • 9.3k
  • 3.6k

विक्याचं प्रेम©®गीता गरुड. काय यार विक्या फोनबिन नाय तुझा. असतोस कुठं हल्ली? दोस्तांची याद करत जा अमवासेपुर्णिमेला. बस काय भावा. तुम्ही तर दिलात अहात माझ्या. तुमची आठवण कशाला काढली पायजेल! दिलात आमी? मंग नाय म्हंजे भेट तू मला हाटेलात. जरा नाश्ता करु. आज मी तुला ट्रीट देतो चल. बरं. येतो दोन तासात येतो. तळ्याजवळच्या हॉटेलजवळ येऊन थांब तू. (विकी सगळं आवरुन दिप्याला भेटायला निघतो. दिप्या येऊन थांबलेलाच असतो. दोघंजणं हॉटेलात शिरतात नि जरा मागच्याच बेंचवर बुडं टेकवतात. दोघांच्या आवडीचा मिसळपाव येतो.) हायबीय केल्यावर दोघं मिसळपाव खाऊ लागतात. काय मंग..दिप्या विचारतो. कुठं काय?..विक्या तू काय मांजर हायस व्हय? म्हंजे? मांजर डोळं