मल्ल प्रेमयुद्ध - भाग 7

  • 7k
  • 4.7k

मल्ल - प्रेमयुद्ध"अर्जुनराव जे हाय ते तुमच्या समोर... कसला आडपडदा न्हाय की लपवाछपवी... हा शेतजमीन बघायला जायचं असेल जाऊ... संग्राम गाड्या काढा." आबांनी आदेश सोडला तसे संग्राम उठला."नको... नको अमास्नी इशवास हाय आबासाहेब... अन इशवास माणसावर असावा जमीनजुमल्यावर न्हाय..." दादा शांतपणे म्हणाले." लाखातली गोष्ट बोललात अर्जुनराव... पण तरी सांगतो. तीस एकरात ऊस लावलाय, वीस एकरात हळद, दहा एकरात तरकारी, बाकी हंगामी असलं 25 एकरात... छोटं मोठं हाय अजून बाकी... गुर ढोर, बैलं गडीमाणसं बघत्यात..." आबा सगळ्या संपत्तीचं वर्णन करत होते." आबासाहेब अहो काहीच गरज नाय एवढं सांगायची. तुमची संपत्ती डोळ्यांसमोर दिसती की... अन ही पोर ही भलीमोठी संपत्ती हाय तुमची."