मल्ल प्रेमयुद्ध - भाग 8

  • 6.7k
  • 4.4k

मल्ल - प्रेमयुद्धगाडी दारात पोहचली. गाडीचा आवाज ऐकून दादा,चिनू नि आई बाहेर आले. समोर वीर क्रांती आणि रत्नाला एकत्र बघून त्यांना पहिल्यांदा काय बोलावे सुचत नव्हते.क्रांतिच्या लक्षात आले." दादा संतू ची गाडी बंद पडली म्हणून मग यांनी आमाला सोडलं." क्रांतीने वीरकडे पाहिले त्यांनीही तसच सांगावं अस तिला वाटले." नमस्कार दादा... ह्या प्रायव्हेट गाडी बघत व्हत्या.. आमास्नी वाटलं एकट्या पोरी कश्या जाणार कोणाबरोबर सुद्धा म्हणून आम्ही सोडवण्यासाठी आलो." क्रांतीला थोडा राग आला. तिने रागाने वीरकडे पाहिले."व्हय दादा खरंच देवावानी भेटले हे म्हणून लवकर आलो." रत्ना" व्हय व्हय बर केलंत या आत या दोघे..." दादा" न्हाय उशीर झालाय आम्ही निघतो." भूषण"अस कस