हरवलेले मित्र...

  • 3.8k
  • 1.2k

हरवलेल्या मित्रांसाठी.... हरवणे ....सापडणे .... मानवी जीवनातला अविभाज्य घटक आहे.बऱ्याचदा आपल्या वस्तू हरवत असतात, त्या शोधल्या तर सापडतात सुद्धा ;पण प्रेमाची ,जीवाभावाची माणसें हरवली की आयुष्यात पुन्हा सापडतील याचा काही भरवसा नाही!म्हणून आपल्या स्नेहातली माणसे , मित्र मैत्रिणी सखे सोबती यांना जीवापाड जपायला हवे... दरवर्षी मैत्रीदिनाच्या निमित्ताने एक दिवस शुभेच्छा दिल्या घेतल्या जातात.पाश्चात्य संस्कृतीला कितीही नावे ठेवली जात असली तरी त्यांची वेगवेगळ्या नात्यांचा सन्मान करणारे हे वेगवेगळे "डे" ज साजरे करायची पध्दत नक्कीच स्तुती योग्य आहे! आजच्या धकाधकीच्या व्यस्त जीवनात असे डेज आता खूप महत्त्वाचे वाटतात, त्या निमित्ताने नात्यांना उजाळा मिळतो ! वेगवेगळी समाज माध्यमे आज मानवी जीवनाचा अविभाज्य भाग