सावध - प्रकरण 14

  • 7k
  • 1
  • 3.9k

सावध प्रकरण १४ दुसऱ्या दिवशी पाणिनी पटवर्धन आपल्या ऑफिसच्या इमारतीत शिरला तेव्हा सकाळचे अकरा वाजले होते. बाहेरच्या पानाच्या टपरीवर कनक ओजसचा एक माणूस पाणिनीला दिसला.पाणिनीच्या मागोमाग तो आत आला आणि लिफ्ट मधे शिरला.लिफ्ट मधे ते दोघेच होते ते पाहून त्याने पाणिनीच्या कोटाच्या खिशात एक कार्ड सरकवले.आणि पाणिनी चा मजला येण्यापूर्वीच तो खाली उतरला.सौम्या च्या अक्षरात कार्डावर निरोप खरडला होता, ‘ ऑफिसात बरेच पाहुणे आलेत.सावध.’पाणिनीने लायटर पेटवून कार्ड जाळून टाकले.ऑफिसचे दार उघडले.आत गर्दीच झाली होती.इन्स्पे.तारकर त्याला सामोरा आला.“ तुझ्याच ऑफिसात तुझे स्वागत आहे पाणिनी.”“ अरे तू कसा काय इथे अचानक?” आश्चर्य दाखवत पाणिनी म्हणाला“ माझ्या बरोबर आलेली मंडळी तुझ्या परिचयाची नाहीत