चंपारामला चंपा एका ऑटो रिक्षा सोबत बोलताना दिसली. तो तिच्याजवळ गेला."कुठे चाललीस?" रामने तिचा हात घट्ट पकडला."सर मला जाऊद्यात." चंपा हात सोडवत होती पण रामची पकड एवढी मजबूत होती की तिला हात सोडवता येत नव्हता."तुम्ही जा भैया." रिक्षावाला बडबड करत निघून गेला."प्लिज मला जाऊदेत, तुम्हाला माहिती नाही हे लोक खूप भयानक आहेत. हे मलाही सोडणार नाहीत आणि माझी मदत करणाऱ्याला ही नाही सोडणार." चंपाच्या डोळ्यात पाणी आले होते. डोळ्यातले पाणी हाताने निर्धाराने पुसत पुन्हा म्हणाली."सर मला काय करायचं आहे हे माझं मी ठरवलंय. मला कोणाची मदत नको.""मला तुला कमजोर करायचे नाही चंपा, हे बघ चाचाची लोक इथपर्यंत आली आहेत तुला