मल्ल प्रेमयुद्ध - भाग 9

  • 7.7k
  • 1
  • 4.9k

मल्ल - प्रेमयुद्ध संग्रामला खूप उशिरा जाग आली. बेड वर तो उठून बसला. डोकं फार जड वाटत होतं. त्याने दोन्ही हाताने डोकं दाबून धरलं. त्याने आजूबाजूला पाहिले. तेजश्री कुठेच दिसत नव्हती. त्याने जोरात हाक मारली."तेजश्री..." तेजश्री स्वयंपाकघराततुन धावत वरती आली. " डोकं जड झालंय... अमास्नी लिंबू पाणी पाहिजे. तेजश्री खाली आली.राजवीर हातामध्ये तेवढ्यात ग्लास घेऊन आला." अरे ती कुठं गेली ते तुला पाठवलं." संग्राम चिडून म्हणाला." वहिनी ना... आधी तू हे घे..." संग्रामने लिंबूपाणी घेण्यासाठी हातपुढे केला. वीरने पाण्याचा ग्लासमधल पाणी त्याच्या तोंडावर भिरकावले. संग्रामला राग आला. वीरची असे वागणे त्याला अपेक्षित नव्हते. संग्राम खाडकन बेडवरून उठला."वीर हे काय वागणं?"