भेटली तू पुन्हा... - भाग 19 (अंतिम भाग)

  • 7.4k
  • 1
  • 3.7k

"अनु आय मिन मायरा तुझं खर नाव आहे" आदि अन्वीला सांगत होता. "मायरा....?" "हो बेटा तुझ्या आईने खुप प्रेमाने तुझं नाव ठेवले होते" जीवन बोलले. "तुम्ही कसे माझे बाबा असू शकता? माझे आई बाबा तर..." तिच्या डोळ्यात पाणी तरळले. तिला होणारा त्रास पाहून आदिला वाईट वाटत होते. "हे बघ अनु मी सगळं सांगतो तू शांतपणे ऐकून घे" "तू जीवन कुमार म्हणजेच यांची मुलगी आहेस" आदि जीवन यांच्याकडे हात करत बोलला. अन्वी पुरती गोंधळली होती. तिला काहीच आठवत कस नाही म्हणून ती स्वतःला त्रास करून घेत होती. "तुझा चुलत भाऊ म्हणजे रुद्रने प्रॉपर्टीसाठी तुला व काकांना मारण्याचा प्रयत्न केला होता. जीवन