मल्ल प्रेमयुद्ध - भाग 14

  • 7.5k
  • 5k

मल्ल- प्रेमयुद्धसंग्राम वेडापिसा झाला होता. खोलीमध्ये येरझाऱ्या घालत होता. तेवढ्यात तेजश्री घाबरतच आत आली. "या आलात आनंद झाला ना...? हो... झाला तर होऊद्यात... आम्ही पाटलाची औलाद हाउत बघू पुढच्या टेस्ट करू अन वारस या घरात आणू..." संग्राम मोठ्याने बोलत होता. तेजश्री शांत होती."आता मनातून उकळ्या फुटत असत्यात म्हणूनच तोंडातन शब्द फुटत न्हाईत. बोला बोला म्हणा काहीतरी आम्हाला नाहीतर शिव्या घाला." संग्राम अस्वस्थ झाला होता. आता मात्र तेजश्रीचा आता स्वतःवरचा ताबा सुटत चालला होता. "का आनंद होईल मला??? मी वांझोटी राहीन म्हणून की पाटलांना मी धनाची पेटी की वंशाचा दिवा देऊ शकणार न्हाई म्हणून... का खुश होईन मी? मला वांझोटी म्हणून