मल्ल प्रेमयुद्ध - भाग 15

  • 8.6k
  • 4.6k

मल्ल- प्रेमयुद्धवाड्यासमोर गाडी थांबली. आबा, सुलोचनाबाई, तेजश्री, संग्राम सगळे बाहेर येऊन स्वागताला उभे राहिले. सुनबाई येणार म्हणून सुलोचनाबाई आणि तेजश्रीला काय करावे आणि काय नको असे झाले होते. सुलोचनाबाईच्या हातामध्ये ओवळणी तबक होते. क्रांतीने स्काय ब्लु कलरची साधी साडी नेसली होती. आधी ड्रेस घातला होता पण नंतर क्रांतीलाच वाटले की पहिल्यांदा सासरी जातीय ते सुद्धा लग्नाआधी तर वीरचा विचार करून नाही आई आबांचा विचार करून साडी नेसायला पाहिजे. क्रांतीने डोक्यावर पदर घेतला. आबा आणि आईच्या पाया पडली. क्रांतीला तेजश्री आणि सुलोचनाने ओवाळले. भाकरी तुकडा ओवाळून टाकला. रत्नालासुद्धा ओवाळले. रत्नाला वेगळे वाटत होते पण सगळ्यांच्या प्रेमाने आणि आपुलकी बोलण्याने तिला घरच्यासारखं