देवचार

  • 7.1k
  • 1
  • 2.8k

#देवचार ऐंशीच्या दशकातली गोष्ट,जेंव्हा आमच्या खेड्यात वाहतुकीची सोय नव्हती. तिन्हीसांज होऊन गेली होती. चारी दिशा अंधारुन आल्या होत्या. माजघरात बाईमाणसं रात्रीच्या जेवणाचं बघतं होती. म्हातारी आजी व आजे वळईत गजाली करीत बसलेले. लहान मुलं पुस्तकं पुढ्यात घेऊन बसली होती. मी देवाला दिवाबत्ती केली व खळ्यात आरामखुर्ची टाकून बसलो होतो. तुळशीसमोरच्या दिव्याची ज्योत निवांत तेवत होती. कोकणात तिन्हीसांज झाली की आजुबाजूची झाडंही स्तब्ध होतात. वारा मंदावतो. पानांची सळसळ थांबते. मी माजघरात गेलो. पिठीभात व सुका बांगडा मुलांसोबत जेवलो व खळ्यात येरझारा घालीत होतो. तितक्यात राण्यांचा सागर लांबूनच येताना दिसला. हळूहळू तो जवळ आला. मला म्हणाला, "आजांका बरा वाटत नाय हा तेंका