चलो कुछ तूफानी करते हैं

  • 7k
  • 2.3k

एके दिवशी अचानक मस्तकात विचार येऊ लागले. काय साली ही जिंदगी रोज तेच सकाळी उठणे, रोजचाच नित्यकर्म करणे. त्यानंतर आंघोळ करून देवपूजा करणे, मग भूख लागली कि पोटभर जेवणे. पोट भरले कि सुस्तावून झोपणे, झोप झाली कि उठणे चहा पिणे आणि मित्रांशी गप्पा गोष्टी करणे. रात्र झाली कि तेच रात्रीचे जेवण करणे आणि मग निवांत झोपणे. साला कंटाळा आलाय अशा या निष्कामी जीवनातून म्हणत आजोबांनी चादर झटकली आणि बेडवर चिंतन करत बसले. आमचे आजोबा शिक्षक म्हणून शाळेत नौकरीला होते. तो त्यांचा नौकरीचा काळ छानरीत्या पार पाडून त्या नौकरीतून ते सेवानिवृत्त झाले. आता फक्त आराम आणि आराम, अरे आराम तो किती