सावध - प्रकरण 22

  • 5k
  • 3.2k

सावध प्रकरण २२ न्यायाधीश आपल्या आसनावरून उठताच मायरा पाणिनीला म्हणाली, “ तुम्ही भारीच आहात.त्या साक्षीदाराला मस्तच गंडवलत तुम्ही.” “ त्याने मला ओळखलं नाही हे मी दाखवू शकलो पण तू तिथे नव्हतीस हे आपल्याला सिध्द करता आलं नाही तर तू तिथे होतीस हे सिध्द होणार आहे.” पाणिनी म्हणाला “ ते बरोबर आहे.” मायरा म्हणाली. “ आणि ज्या बंदुकीने खून झालाय परब चा, ती रिव्हॉल्व्हर तुला आदित्य कोळवणकर ने दिली होती. आणखी एक म्हणजे परितोष हिराळकर चा सुध्दा खून झालाय आणि तू त्याचा वीस लाख रकमेचा आयुर्विमा उतरवला आहेस.” “ अहो पटवर्धन, आमचं लग्न ठरलं होतं.एका स्त्रीला लागणारी सुरक्षितता, घर,प्रेम सर्व काही