मनी उवाच

  • 8.8k
  • 3.4k

#मनी_उवाच काय मग मंडळी,कसं काय बरंय नं! थंडी वाजतेय नं. अगं बाई,ओळख करुन द्यायची राहिलीच की. मी मीना मांजरेकरांची मनी. इथे अंगणात जरा उन्हाला बसायला आले होते. रात्रभर झोप नाही ओ . काय सांगणार तुम्हाला,अहो मांजरेकर भाऊ लई घोरतात नी त्याच्या वरच्या पट्टीत मांजरेकरीन घोरती. रेकॉर्ड केलात तर एक छान संगीताचा कार्यक्रम होऊ शकतो. मला नुसतं कुडकुडायला होतं. दात दातावर आपटतात. पहिले मी चुलीजवळच्या रखेत निजायचे माजघरात. आत्ता मांजरेकर भाऊंनी गेस घेतला नं. चूल आहे पण कधी पेटवत नाहीत. मला सांगा बरं, माझ्यासारखीने काय करायचं? आधीच माझं अंग कसं मऊ मऊ, जरा थंडीची झुळूक आली की अंगावर शहारा येतो बाई