किस्से मैत्रीचे

  • 5.1k
  • 2.1k

#मैत्रीचे_भन्नाट_किस्से तसा मी लहानपणापासून एकलकोंडा होतो.मित्रांच्या गर्दीत मी फारसा रमत नव्हतो तरी जोडलेल्या मोजक्या मित्रांच्या आठवणी या निमित्ताने निश्चितच सांगायला आवडतील.... शाळेत जाण्यापूर्वी तसे आमच्यावर कुणाचे आणि कसलेच बंधन नव्हते,सकाळी एकदा आईवडील शेतात गेले की पक्या,धुऱ्या,पांडुरंग अशा आम्हा संवंगड्यांचेच राज्य असायचे. मनाला येईल तसे हुंदाडणे चालू असायचे.वाडीच्या जवळच वाहता ओढा आणि सिध्देश्वराचा डोह होता.खेळत खेळत आमचा मोर्चा दररोज या डोहावर जायचा.डोहात डुंबत मस्ती करता करता वयाच्या चार पाच वर्षातच आम्ही मित्र अगदी तीन पुरुष खोल पाण्यात पट्टीचे पोहायला शिकलो होतो आमच्या पालकांना याचा मुळीच पत्ता नव्हता ! मी आणि पांडुरंग जिथे जाईल तिथे बरोबर असायचो.आमच्या वाडीवर आम्हा दोघांना गंडोरीवाला आणि