लग्नगाठ (एक अनोखा प्रवास) - भाग १

  • 14.6k
  • 5.3k

लग्नगाठ (एक अनोखा प्रवास): भाग १."आली लग्न घडी समीप नवरा घेऊनि यावा घरा । गृहतके मधुपर्क पुजन करा अन्त पाटते धरा दृष्टादृष्ट वद्य वरा न करिता, दोघे करावी उभी। वाजंत्रे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम।कुर्या सदा मंगल शुभ मंगल सावधान ।",भटजी शेवटच मंगलाष्टक बोलतात ,तसे सर्वजण अक्षता नवरा नवरीच्या डोक्यावर टाकत असतात. त्या दोघांमधील अंतरपाट दूर होऊन जातो. "एकमेकांना हार घालून घ्या!", भटजी दोघांना पाहत म्हणाले. तसा नवऱ्याच्या वेषात असलेला तो आपल्या हातातील हार पुढे असणाऱ्या त्या मुलीच्या गळ्यात काहीसा रागवून घालतो. ती तर आधीच कावरीबावरी झाली होती. लग्न काय असते? हे काही तिला माहीतच नव्हते! थोडी कापत होती.