मल्ल प्रेमयुद्ध - भाग 17

  • 5.9k
  • 3.8k

मल्ल प्रेमयुद्ध आत्याचा टुमदार बंगला आतून वेल फर्निचर होता पण नारळाची झाडं, समुद्राच्या पाण्याचा आवाजामुळे कोकणचा वारा चांगलाच लागत होता. आत्याने मुलींची सोय वरच्या मजल्यावर केली होती आणि मुलांची सोय आत्याचा मुलगा ऋषीच्या रूममध्ये वरच्या मजल्यावर केली होती. ऋषी बोलका, स्मार्ट आणि बडबडा... वीर आणि संग्रामचा लाडका असतो. त्याच्या रूममध्ये आरामात आठ दहा लोक झोपतील एवढी मोठी खोली होती. आत्याने सगळ्यासाठी पुरणपोळीचा बेत केला होता. तेजश्री काही मदत हवी का म्हणून विचारायला गेली पण आत्या नोकरांना सूचना देत त्यांच्याकडून सगळं करून घेत होत्या. "का ग बाळा काय पाहिजे का तुला?" आत्याने प्रेमाने तेजश्रीला विचारले. "न्हाई आत्या तुमाला काही मदत पाहिजे