पप्पाची परी परीचा बाप

  • 6.1k
  • 1.9k

पप्पाची परी परीचा बाप रोजच्या प्रमाणेच मी नोकरी निमित्त गावाहून जिल्हयाच्या ठिकाणी जाण्यासाठी सकाळी नऊ वाजता बसस्थानकामध्ये आलो. तेवढयात मला पंधरा वर्षापुर्वी आमच्या गल्लीमध्ये राहणारे पण सद्या दुसऱ्या कॉलनीमध्ये राहायला गेलेले अजित काका दिसले. मला पाहून ते माझ्याकडेच आले.            “खूप दिवसांनी भेट झाली तुझी.”           मी, “ हो काका. आपली बऱ्याच दिवसांपासून भेट नाही.”           तेवढयात बस आली. सुदैवाने बस रिकामीच होती. त्यामुळे आम्हा दोघांना एकाच सिटवर बसायला जागा मिळाली.           काका “अरे, माझी आता तालुक्याहून जिल्हयाच्या ठिकाणी बदली झाली आहे. त्यामुळे आता आपली बहुतेक रोजच भेट होईल.”           मी आनंदाने, “हो.बरंच झालं तुमची ईकडे बदली झाली ते.”